सलाईन
÷:÷:÷:÷:÷:÷: सलाईन ÷:÷:÷:÷:÷:÷: डॉ.कुबेर यांची ओ.पी.डी.आज पेशंटनी खचाखच भरली होती.आतल्या कॉटवर सिंगल डबल पेशंट सलाईनवर होते.बाहेर व्हरांड्यातल्या लोखंडी बाकड्यावर चार-पाच,तर प्लायवूडच्या बसणीवर सात-आठ पेशंट डॉक्टरांच्या दर्शनासाठी रांगेत बसले होते.पेशंट आला,धुतला आणि वाळत घातला असा पैसेकमावू उद्योग डॉ.कुबेरांनी कधी केला नव्हता.एका एका पेशंटला अर्धा-अर्धा तास तपासणीसाठी गेला तरी त्यांनी कधी घाई-गडबड केली नव्हती.बाहेरच्या रांगेतील पेशंट बोंबा मारायचे पण डॉक्टरांनी आपला वसा कधी टाकला नाही. आजही एवढी गर्दी असूनही डॉक्टरांनी एक-एक पेशंट अगदी निवांतपणे तपासला.जसजशी वेळ वाढू लागली तसतशी रांगेतल्या पेशंटची हताशता आणि टेंपरेचर वाढू लागले. लोखंडी बाकड्यावर बसलेला परशा बेचैन बेचैन वाटत होता.बाकड्यावरुन उठून बाहेर जावे तर नंबर हुकायची भीती म्हणून तो जागचा उठत नव्हता.हाता-पायांची थरथर जास्तच वाढली होती.मळमळही होत होती.मधूनच गोल गोल फिरल्यासारखे वाटत होते.आता इथून उठून जावे तर तीही मोठी पं...