दारुपुराण : भाग १/अशोक आणि समाधान
....गोष्ट रात्रीचीच...ज्यांचं आयुष्य सालं घालण्यातच गेलं त्या अशोकने कंपनी हवी म्हणून मला सोबत येण्याचा आग्रह केला.गेलो...त्यांनी त्यांचा ब्रँड घेतला व मी कोल्ड्रींक्स... अशोक ख-या अर्थाने सालगडी..किती वर्षे झाली एकाच शेतक-याकडे सालावर आहे हे मलाही नक्की माहीत नाही...बाहेरगावहून येऊन इथे चाकरी करत करत अशोकने चिंचेचा व्यापार ही केला..बायको,मुलगी व मुलगा असा त्याचा परिवार.मुले हुशार तर होतीच पण बापाच्या गरीबीची आणि कष्टाची त्यांना जाण होती..मुलगी दहावी बारावी शिकली..तिचे लग्न थाटात लावून दिले.चाकरी करत करत मुलगा समाधान याला इंजिनियर केले.तो आज ४५ हजार पगार घेतोय.अगदी शांत,समजूतदार व निर्व्यसनी मुलगा.दिवस निवांत बसून खाण्याचे,पण अशोकने चाकरी सोडलेली नाही.खर्चापाण्यासाठी समाधाकडून एक रुपयाही घेत नाही.त्याचे समाधानला एकच सांगणे आहे," तू मला एक रुपयाही देऊ नको.सालं घालून मी जेवढं आणि जसं कमवलं तसंच तू तुझ्या तुझ्या भविष्यासाठी कमवून ठेव यातच मला समाधान आहे." समाधान अशोकचे समाधान नक्कीच करणार यात शंका नाही.कारण त्याला आपल्या भूतकाळाची जाण आहे. ...