Posts

Showing posts from September, 2015

सुगला

Image
:::::::::::: सुगला :::::::::               (ग्रामीण कथा) डोक्यावरच्या गवताच्या ओझ्याने तिची मान पाठ भरुन आली होती.कमरेतून निघालेली कळ थेट अवघडून गेलेल्या खांद्यापर्यंत पोहोचत होती.तरीही सुगला चालतच होती.ओझ्यामुळे तिची चाल जरा बेढबच भासत होती.पण त्या निर्जन वाटेवर ती चाल पाहणारे कुणी नव्हते म्हणून ती तशीच पाय ओढत अंतर कापायचा प्रयत्न करत होती....      सरावण सरत आला तरी पाऊस अजून हाद्या म्हणत नव्हता.आभाळ तर भरुन यायचे पण रीते व्हायचे नाही.जिकडे बघावे तिकडे मातीच्या लेकरांची नुसती होरपळ चाललेली दिसत होती.हाता-तोंडाशी आलेला घास घारीने झडप घालून हिसकावून न्यावा तसेच या दुष्काळाने केले होते.प्यायच्या पाण्याची अजून परापत झाली नसली तरी हे दिवस असेच पुढे राहिले तर मग मात्र जगणे मुश्कील झाले असते.हाताला तर काहीच कामधंदा मिळत नव्हता.पण सुगलाने अजून धीर सोडला नव्हता.गावात जरी कुठेच हिरवे दिसत नसले तरी गावापासून तीन कोसावरच्या वाण्याच्या वस्तीवर मात्र देवाची किरपा पहिल्यापासून होती.तो जिवंत पाण्याचा भाग असल्यामुळे तिथे पाण्याचा तुटवडा न...

सरपंचाचा जीआर

Image
::::::::::::::: सरपंचाचा जीआर :::::::::::: चणेवाडीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लवकरच लागणार होती.सरपंच मदनराव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला होता.या पाच वर्षांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी गावात तब्बल पन्नास कोटींची विकासकामे केली होती.पण ती मदनरावाशिवाय कुणालाच दिसत नव्हती.आणि दिसणार तरी कशी?सगळ्या योजना कागदावरच होत्या.पन्नास कोटी मात्र सरपंचांच्या खिशात जमा झाले होते.आता निवडणुकीला उभे रहायचे तर विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिल्यासारखे होईल.गेल्या वेळीच विरोधकांनी आणि नुकत्याच उदयास आलेल्या सटरफटर पुढाऱ्यांनी मदनरावांवर नाही नाही ते आरोप केले होते.आता तर त्यात आपल्याच गटातले काही लोक सामिल होणार हे तर उघडच दिसत होते.कारण अडीच वर्षे मदनरावांनी सरपंचपद भोगायचे व उरलेली अडीच वर्षे श्रीपतरावांनी सरपंचपद उपभोगायचे असे आधीच ठरले होते.पण आपल्या कामाचे अधिकारी आणि कामाच्या योजना यांची ओळख व्हायलाच मदनरावांचा एक-दीड वर्षांचा काळ लोटला.परिणामी मदनरावांनी आधी ठरल्याप्रमाणे अडीच वर्षानंतर सरपंचपद सोडले नाही.त्यांच्याविरुध्द अविश्वास ठराव आणण्याचा श्रीपतरावांनी प्रयत्न केला पण ...

खेड्यातली दिवाळी

Image
खेड्यातली दिवाळी "मना-मनात नैराश्याचा अंध:कार आहे संपत्तीने श्रीमंत पण प्रेमाचा भुकेला आहे! ओठावर हसु तर आहे पण काळजावर दुःखाचा भडीमार आहे ! घ्या एक पणती हाती जरा मानवतेची सगळ्यांना प्रकाश आता वाटायचा आहे ! उजळुन चेहरा प्रेमाने सत्याचा आनंद सर्वांचा साजरा करायचा आहे... !" नैराश्याच्या गर्तेतून आशेच्या सागरात मुक्त विहार करण्यासाठी प्रेरणा देणारा भारतीय सण म्हणजे दिवाळी!लक्ष लक्ष दिव्यांनी अंगण उजळून निघत असताना मनाचा कोपराही प्रज्वलित अन् प्रकाशमय होऊन जातो.सर्व संकटांचा आणि दु:खाचा क्षणभर विसर पडून आनंदाचा क्षण भरभरुन साजरा करण्याची उर्मी हा दिवाळी सण घेऊन येतो.       ज्याप्रमाणे प्रत्येक चार कोसावर भाषेच्या अलंकारात,शब्दात व नादामध्ये जसा फरक पडत असतो तसाच तो रितीरिवाजातही थोड्याफार प्रमाणात जाणवत असतो.आनंद तोच असतो पण साजरा करण्याची पद्धत काही अंशी बदललेली असते.हेच वेगळेपण लक्षात घेऊन खेड्यातली दिवाळी कशी साजरी होते हे पाहणे औत्सुक्याचे होईल.कारण आपल्या भारतीय संस्कृतीचा डंका सातासमूद्रापार वाजत असला तरी ही संस्कृती जतन करण्यामध्ये शहरांपेक्षा खेड्यां...

एक अनोखी लवस्टोरी

Image
 प्रिय सोनुल्या,                 हॅप्पी बर्थ डे टू यू... माझ्या शोन्या,तुला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा!!     तुझ्या जन्मदिनाच्या इव्हेंटला मी हजर राहू शकत नाही म्हणून स्वॉरी यार!परत भेटल्यावर मी याची भरपाई करेन.सध्या आई-बाबांचे भांडण सुरु आहे त्यामुळे मी थोडी अपसेट आहे.म्हणून तुला भेटायला येऊ शकत नाही.तू समजून घे रे...स्वीटू!      ये नॉटी,मनातल्या मनात काय विचारतोस काय झाले म्हणून?तू तर माझ्या ह्रुदयात असा फिट्ट बसला आहेस कि तुझे मन मी इथे बसून ओळखू शकते.जा...तुला नाही विश्वास पटणार!तिकडे अजून कुणीतरी असेल ना...म्हणून माझे मन तुला कळतच नाही.जावू दे...फॉरगॉट इट...तू अस्साच माझ्या ह्रूदयात कायम रहा.आणि हो,मला पण तुझ्या ह्रुदयात अस्सेच जाम फिट कर.माझे पण मन तुला कळले पाहिजे ना!आता मी इकडे किती जळतेय तुला काय ठाऊक?काय शोन्या तू पण ना...नाही...नाही...तो स्टोव्ह वगैरे भडकून जळण्याचा हा वेडा प्रकार नाही.आणि वेड्या,आता साडीच कुठे असते रे पेटायला?...मी तर जीन्स पँट आणि शॉर्टसच घालते ना.त्यामुळे नो आग...नो  जा...