गुलाब आणि धोतरा

अतिलघूकथा
गुलाब आणि धोतरा

       एकदा काय झाले...गुलाबाची आणि धोत-याच्या फुलाची दोस्ती झाली.जिथे जिथे गुलाब असे तिथे तिथे धोत-याचे फूलही असे.कुठेतरी उकिरड्यावर फुलून दुर्गंध पसरवणा-या धोत-याच्या फुलाच्या वाट्याला नेहमी हेटाळणीच आलेली होती.पण गुलाबाच्या संगतीने त्याची दुर्गंधी तर कमी झालीच पण गुलाबाचा सुगंध ही त्याच्या काही पाकळ्यांना लागला.गुलाब बिचारा अबोल..धोतरा बोलघेवडा! आपल्या बोलघेवड्यापणाने त्याने लोकांना भूरळ पाडली.लोकही आता धोत-याची हेटाळणी करत नव्हते.
...आणि म्हणूनच त्याला असे वाटू लागले की लोक गुलाबापेक्षा आपल्यालाच जास्त मानतात.तो स्वतःला गुलाबापेक्षाही श्रेष्ठ समजू लागला.गुलाबाबरोबर फिरुन उगीच वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपलीच किर्ती वाढवण्यासाठी वेळ खर्ची घालावा असा त्याने निर्णय घेतला...आणि गुलाब व  धोत-याच्या फुलातील दोस्तीत अंतर पडू लागले.बिचारा गुलाब मूकपणे अश्रू ढाळत एकटाच आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिला.
....आज गुलाबाला फुलांच्या राजाचा मान आहे.धोत-याचे फूल दुर्गंधी पसरवत तिथेच उकिरड्यावर उभे आहे..!

© अनिल एस.राऊत

Comments

Popular posts from this blog

नागपंचमी: काल आणि आज

सावधान..! शिक्षणाच्या गंगेत राजकिय गटाराचे पाणी मिसळतेय!

एक ओवाळणी-माझ्या `त्या' बहीणीसाठी...