मसुटा आणि मायमातीतली मायेची ओल
मसुटा आणि मायमातीतली मायेची ओल
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
https://www.mxplayer.in/movie/watch-masuta-movie-online-ac4295019b64f6d75771e3f9b7bdac4e?utm_source=mx_android_share
दिनांक 6 अॉगस्ट 2020 ला आमचा मसुटा चित्रपट एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाला आणि तो दिवस वैयक्तिक माझ्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरला.कारण कोणत्याही पहिल्या गोष्टीचे अप्रुप अधिक असते आणि इतिहासही त्याची नोंद ठेवतो.मसुटा हा ही मी संवादलेखन केलेला प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला.यापुढेही ज्यात माझ्या लेखनाचा सहभाग असेल असे माझे अनेक चित्रपट येतील..येत राहतील.
ज्या चित्रपटसृष्टीचे प्रत्येकालाच आकर्षण असते त्या चित्रपट सृष्टीपर्यंत पोहोचणेच मुळात अवघड असते.
तसा सौंदणे गावचा आणि चित्रपटसृष्टीचा संबंध नवा किंवा आजचा नाही.साधारण 50 वर्षांपुर्वी आठ अपत्ये असलेल्या व अत्यल्प मजुरीवर गवंडी काम करुन दहा-बारा जणांचे पोट भरण्याची कसरत करणा-या बाळू सुतकर यांच्या भागवत व गोपाल या दोन मुलांनी दहावीनंतर उपजिवीकेसाठी गाव सोडले.आणि कित्येक वर्ष ते गावाकडे फिरकलेच नाहीत किंवा कसलाही संपर्क ठेवला नाही.
जेव्हा पुढे अनेक वर्षांनी ते गावात आले तेव्हा त्यांचा रुबाब पाहून गावाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली.त्यांच्या तोंडून गावाला एवढेच कळले की ते हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत आणि सिनेमाचे शूटिंग करतात.आजही गाववाले हेच मानतात.यातील गोपाल सुतकर यांनी एका नामांकीत व बड्या प्रॉडक्शन हाऊसचे प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहिलेले आहे व आजही मुंबईत ते याच प्रॉडक्शन हाऊससाठी काम करत आहेत.तर भागवत सुतकर हे या चंदेरी दुनियेत लाईटमन म्हणून काम पाहत होते.या दोघांचे गावाला तेव्हाही कौतुक होते आणि आजही आहे.
या दोघानंतर चित्रपट दुनियेत प्रवेश करण्याचा बहुमान मला मिळतोय यासारखा दुसरा आनंद नाही.त्या दोघांएवढेच माझेही गावाला कौतुक वाटते आहे हे गाववाल्यांनी दिलेल्या प्रेमातून दिसून आले.शिवाय मायमातीतली मायेची ओलही जाणवली.
.............आभार प्रदर्शन.........
सगळ्यात आधी मी विकास इंगळे सर यांचे आभार मानेन.त्यांनी मला प्रत्यक्षात काहीच दिले नाही.ना माझे गाणे केले,ना मला कसली संधी दिली तरीही मी त्यांचे पहिल्या प्रथम आभार मानतोय कारण "मराठी कविता" या वेबसाईट वरील माझ्या कविता वाचून त्यांनी चित्रपटासाठी गाणी लिहून देता का अशी फोनवरुन विचारणा करुन मला चित्रपटसृष्टीचे दार उघडे करुन दिले.पुढे त्यांनी माझ्या गाण्यांवर काहीच केले नाही हा भाग वेगळा पण त्यांच्या माध्यमातून मला संगीतकार संजयराज गौरीनंदन सर,दिग्दर्शक अजित देवळे सर यांसारखी मातब्बर माणसे भेटली.यापुढचे सर्वांना माहितच आहे म्हणून विकास इंगळे सरांचे खास आभार!
संगीतकार संजयराज गौरीनंदन सरांनी गीतकार बनवले तर अजित देवळे सरांनी पटकथा,संवाद लेखक बनवले म्हणून या दोघांचे विशेष आभार..!
ओळखींची साखळी एकापासुन दोन,दोनापासुन चार अशी वाढत गेली आणि मसुटासह काळी माती, प्रेमांतर,मन बावरे,फ्रेंड रिक्वेस्ट,जिगरी,वेदना या प्रोजेक्ट मध्ये माझा सहभाग नोंदला गेला.त्या त्या वेळी या प्रोजेक्ट बद्दल बोलता येईल.सध्या मसुटा चित्रपटासंदर्भात बोलू या...मसुटाचे संवादलेखन करण्याची संधी मला दिग्दर्शक अजित देवळे सर,निर्माते भरत मोरे सर व मनेष लोढा सर यांनी दिली त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक आभार..!
याशिवाय माझ्या संवादांना प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवलेले चित्रपटाचे कलाकार नागेश भोसले सर,अनंत जोग सर,कांचन पगारे सर,हृदयनाथ राणे सर,वैशाली केंदळे मैम,अर्चना जी महादेव,रियाज जी मुलाणी,बालकलाकार यश मोरे,आश्लेषा सानप,डॉ.बानेश गायकवाड सर,शाम श्रीवास्तव सर,ऐश्वर्या जी,सुरेश पटनाईक सर,सुनिल शिंदे सर,मकरंद चौधरी सर,शिवम जी नागरे या सर्वांचे हृदयापासुन आभार..!
आता माझ्या मायमातीतल्या जिव्हाळ्याविषयी
यातही सर्वात प्रथम मी आभार मानेन माझे मित्र सिद्धेश्वर खिलारे आणि माझ्या सर्व पत्रकार मित्रांचे..बातमी करुन ती जिल्ह्यातील सर्व दैनिकांच्या पत्रकारापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य सिद्धेश्वर खिलारे यांनी केले.त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..!आणि ती बातमी आपल्या दैनिकात छापून आणण्याचे काम त्या त्या पत्रकार मित्रांनी केले.त्याबद्दल दै.दिव्य मराठीचे सम्मेद जी शहा,दै.लोकमतचे महेश कोठीवाले सर,दै.पंढरी संचार,दै.जनसत्य व दै.शरदनगरीचे दशरथ जी रणदिवे,दै.कटूसत्यचे संपादक पांडुरंग(नाना) सुरवसे,दै.पंढरी भूषणचे सावता जी जाधव,दै.सुराज्यचे संजय जी आठवले,दै.दामाजी एक्सप्रेसचे नसीर जी मोमीन,दै.बंधूप्रेमचे रफिक जी शेख,साप्ता.रणयुगचे प्रमोद जी बिनवडे या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे.
बातम्या प्रसिद्ध होत गेल्या आणि अभिनंदन व शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला.इतका कि सगळ्यांची नावे घ्यायची म्हटले तर लांबलचक लेख होईल.मला लिहायचा कंटाळा नाही पण वाचकांना नक्कीच कंटाळा येईल म्हणून हात थोडा आखडता घेतोय पण ज्यांची नावे आली नाहीत त्यांच्याविषयीच्या प्रेमात तसुभरही कमी येणार नाही.वाटसप,फेसबुकसारख्या सोशल मिडीयावरुन माझ्या विषयी प्रेम व्यक्त केलेल्या त्या माझ्या सर्व जीवलगांचे मनःपूर्वक आभार...!
मसुटाविषयी ज्यांनी आवर्जून बाईटस दिले त्या संगीतकार संजयराज गौरीनंदन सर,गायिका निहारिका सिन्हा मैम,अभिनेते-दिग्दर्शक राम माळी सर,अभिनेते राहुल जी पीएन राजे,वृत्तनिवेदक विजयकुमार लडकत सर,दै.कटूसत्यचे संपादक व वृत्तदर्पण न्यूज चॅनल प्रमुख पांडूरंग सुरवसे यांना मी मनापासून धन्यवाद देतो.
याप्रसंगी माझे विशेष अभिनंदन केलेले ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश जी बारसकर, मित्रवर्य अॅड.प्रेमनाथ सोनवणे,बलभिम भानवसे,जीवन गायकवाड,बाबासाहेब सुतकर,रणजीत भानवसे,नागेश नामदे,राजकुमार भानवसे,सुजीत मोकाशी,सागर राऊत,मयूर मोकाशी,अतूल भानवसे,मुरेश मोकाशी,पूजा राऊत,उत्कर्षा देवमारे यांचे मनःपूर्वक आभार..!
आपल्या व्यस्त ड्युटीतून वेळ काढून मसुटाविषयी तासभर गप्पा मारणारे पो.ना.गजानन माळी यांचाही मी आभारी आहे.
हे सगळे माझ्या संपर्कातले जीवलग...पण हा लेख लिहीत असताना आश्चर्याचा धक्का देणारी एक घटना घडली.दै.दिव्य मराठी मधील बातमी वाचून माझ्यासाठी अनोळखी असलेल्या बार्शीच्या नयुमभाई शेख यांचे अभिनंदनपर पत्र पोहोच झाले.ऊर भरुन आला.पत्रात दिलेल्या नंबरवरुन त्यांना कॉल केला.आभार मानले.पण तिथेही त्यांनी दुसरा धक्का दिला.म्हणाले," तुमच्या 9890... या नंबरवर कॉल केले पण तो नंबर बंद लागत होता."
मी उडालोच.म्हटलं माझा हा नंबर तुमच्याकडे कसा?
तर म्हणाले," 3 सप्टेंबर 2017 ला दै.सकाळच्या सप्तरंगमध्ये अशी बोलते माझी कविता सदरात तुमची कविता आली होती तेव्हाही मी कॉल केला होता."
त्यावेळी सलग दोन दिवस मी फोनवरच बोलत होतो इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.सगळे कॉल रेकॉर्ड मी जपून ठेवलेले आहेत.पण एवढी नावे कशी लक्षात ठेवणार? मी तर विसरुनच गेलो होतो.पण नयुमभाई मला विसरलेले नव्हते.असे वाचक,चाहते मिळायला आणि त्यांच्याशी मैत्री जमायला नशिब लागते.नयुमभाईंनी नशिबाचा हाही एक भाग उलगडून दाखविला..नयुमभाई,आपल्या या प्रेमाबद्दल मी आपला हृदयपूर्वक आभारी आहे!
आणि कोणताही चित्रपट ज्यांच्यासाठी बनवला जातो त्या मायबाप प्रेक्षकांचे हजारो हृदयांनी धन्यवाद!!
माझी जन्मभूमी,कर्मभूमी असलेल्या माझ्या सौंदणे गावातील प्रत्येक नागरिकाचे प्रेम मला मिळालेले आहे.त्याबद्दल मी सर्व सौंदणेकरांचा शतशः आभारी आहे!
शेवटी पुनश्च: एकदा सर्वांचेच मनःपूर्वक आभार...धन्यवाद!!!!
आपलाच अनिल एस.राऊत
नयुमभाई 🥰🥰....
ReplyDelete