Posts

आयुष्य

Image
*आयुष्य* गर्भातल्या गूढ अंधारातून सुरु होतो आयुष्याचा प्रवास-भविष्यकाळाच्या उदरातील अनाकलनीय दिशेने...!गूढ अंधारातून लख्ख प्रकाशात जेव्हा प्रवेश होतो आयुष्याचा-तेव्हा हसत असते प्रकाशाला निर्ढावलेले आयुष्य अन् रडत असते प्रकाशात प्रवेश करणारे आयुष्य! तिथूनच पंख फुटतात आयुष्याला...ज्याच्या त्याच्या प्राक्तनानुसार घडत जाते ज्याचे त्याचे आयुष्य...कुणाचे आयुष्य अल्पजीवी ठरते तर कुणाचे आयुष्य मध्यजीवी...कुणाचे आयुष्य सरकत जाते पूर्णत्वाकडे!       आयुष्याचा प्रवास असा क्षणा-क्षणांचे गतिरोधक पार करत सरकत असतो पुढे...कुणाचे आयुष्य ठेचकाळते अशा गतिरोधकांना...चाल धीमी होते आयुष्याची अन् कधी कधी हे आयुष्य सरकते बाजूला या प्रवासातून...इथपर्यंतच असतो त्याचा प्रवास...! बाकीची आयुष्ये मग शोधत रहातात आपल्याच प्रवासातील अडखळलेल्या गतिरोधकांची लांबी-रुंदी अन् खूश होतात पार केल्याच्या आविर्भावात!       आयुष्यालाही असतात अवस्था...बाल्यावस्था,तारुण्यावस्था आणि वार्धक्यावस्था!       भुईच्या उदरातून नुकत्याच अंकुरलेल्या अंकुरासारखे मुलायम आणि सोज्वळ असते बाल...

सलाईन

Image
         ÷:÷:÷:÷:÷:÷: सलाईन ÷:÷:÷:÷:÷:÷:       डॉ.कुबेर यांची ओ.पी.डी.आज पेशंटनी खचाखच भरली होती.आतल्या कॉटवर सिंगल डबल पेशंट सलाईनवर होते.बाहेर व्हरांड्यातल्या लोखंडी बाकड्यावर चार-पाच,तर प्लायवूडच्या बसणीवर सात-आठ पेशंट डॉक्टरांच्या दर्शनासाठी रांगेत बसले होते.पेशंट आला,धुतला आणि वाळत घातला असा पैसेकमावू उद्योग डॉ.कुबेरांनी कधी केला नव्हता.एका एका पेशंटला अर्धा-अर्धा तास तपासणीसाठी गेला तरी त्यांनी कधी घाई-गडबड केली नव्हती.बाहेरच्या रांगेतील पेशंट बोंबा मारायचे पण डॉक्टरांनी आपला वसा कधी टाकला नाही.       आजही एवढी गर्दी असूनही डॉक्टरांनी एक-एक पेशंट अगदी निवांतपणे तपासला.जसजशी वेळ वाढू लागली तसतशी रांगेतल्या पेशंटची हताशता आणि टेंपरेचर वाढू लागले.       लोखंडी बाकड्यावर बसलेला परशा बेचैन बेचैन वाटत होता.बाकड्यावरुन उठून बाहेर जावे तर नंबर हुकायची भीती म्हणून तो जागचा उठत नव्हता.हाता-पायांची थरथर जास्तच वाढली होती.मळमळही होत होती.मधूनच गोल गोल फिरल्यासारखे वाटत होते.आता इथून उठून जावे तर तीही मोठी पं...

सुगला

Image
:::::::::::: सुगला :::::::::               (ग्रामीण कथा) डोक्यावरच्या गवताच्या ओझ्याने तिची मान पाठ भरुन आली होती.कमरेतून निघालेली कळ थेट अवघडून गेलेल्या खांद्यापर्यंत पोहोचत होती.तरीही सुगला चालतच होती.ओझ्यामुळे तिची चाल जरा बेढबच भासत होती.पण त्या निर्जन वाटेवर ती चाल पाहणारे कुणी नव्हते म्हणून ती तशीच पाय ओढत अंतर कापायचा प्रयत्न करत होती....      सरावण सरत आला तरी पाऊस अजून हाद्या म्हणत नव्हता.आभाळ तर भरुन यायचे पण रीते व्हायचे नाही.जिकडे बघावे तिकडे मातीच्या लेकरांची नुसती होरपळ चाललेली दिसत होती.हाता-तोंडाशी आलेला घास घारीने झडप घालून हिसकावून न्यावा तसेच या दुष्काळाने केले होते.प्यायच्या पाण्याची अजून परापत झाली नसली तरी हे दिवस असेच पुढे राहिले तर मग मात्र जगणे मुश्कील झाले असते.हाताला तर काहीच कामधंदा मिळत नव्हता.पण सुगलाने अजून धीर सोडला नव्हता.गावात जरी कुठेच हिरवे दिसत नसले तरी गावापासून तीन कोसावरच्या वाण्याच्या वस्तीवर मात्र देवाची किरपा पहिल्यापासून होती.तो जिवंत पाण्याचा भाग असल्यामुळे तिथे पाण्याचा तुटवडा न...

सरपंचाचा जीआर

Image
::::::::::::::: सरपंचाचा जीआर :::::::::::: चणेवाडीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लवकरच लागणार होती.सरपंच मदनराव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला होता.या पाच वर्षांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी गावात तब्बल पन्नास कोटींची विकासकामे केली होती.पण ती मदनरावाशिवाय कुणालाच दिसत नव्हती.आणि दिसणार तरी कशी?सगळ्या योजना कागदावरच होत्या.पन्नास कोटी मात्र सरपंचांच्या खिशात जमा झाले होते.आता निवडणुकीला उभे रहायचे तर विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिल्यासारखे होईल.गेल्या वेळीच विरोधकांनी आणि नुकत्याच उदयास आलेल्या सटरफटर पुढाऱ्यांनी मदनरावांवर नाही नाही ते आरोप केले होते.आता तर त्यात आपल्याच गटातले काही लोक सामिल होणार हे तर उघडच दिसत होते.कारण अडीच वर्षे मदनरावांनी सरपंचपद भोगायचे व उरलेली अडीच वर्षे श्रीपतरावांनी सरपंचपद उपभोगायचे असे आधीच ठरले होते.पण आपल्या कामाचे अधिकारी आणि कामाच्या योजना यांची ओळख व्हायलाच मदनरावांचा एक-दीड वर्षांचा काळ लोटला.परिणामी मदनरावांनी आधी ठरल्याप्रमाणे अडीच वर्षानंतर सरपंचपद सोडले नाही.त्यांच्याविरुध्द अविश्वास ठराव आणण्याचा श्रीपतरावांनी प्रयत्न केला पण ...