Posts

मसुटा आणि मायमातीतली मायेची ओल

Image
 मसुटा आणि मायमातीतली मायेची ओल :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: https://www.mxplayer.in/movie/watch-masuta-movie-online-ac4295019b64f6d75771e3f9b7bdac4e?utm_source=mx_android_share दिनांक 6 अॉगस्ट 2020 ला आमचा मसुटा चित्रपट एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाला आणि तो दिवस वैयक्तिक माझ्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरला.कारण कोणत्याही पहिल्या गोष्टीचे अप्रुप अधिक असते आणि इतिहासही त्याची नोंद ठेवतो.मसुटा हा ही मी संवादलेखन केलेला प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला.यापुढेही ज्यात माझ्या लेखनाचा सहभाग असेल असे माझे अनेक चित्रपट येतील..येत राहतील.     ज्या चित्रपटसृष्टीचे प्रत्येकालाच आकर्षण असते त्या चित्रपट सृष्टीपर्यंत पोहोचणेच मुळात अवघड असते.     तसा सौंदणे गावचा आणि चित्रपटसृष्टीचा संबंध नवा किंवा आजचा नाही.साधारण 50 वर्षांपुर्वी आठ अपत्ये असलेल्या व अत्यल्प मजुरीवर गवंडी काम करुन दहा-बारा जणांचे पोट भरण्याची कसरत करणा-या बाळू सुतकर यांच्या भागवत व गोपाल या दोन मुलांनी दहावीनंतर उपजिवीकेसाठी गाव सोडले.आणि कित्येक वर्ष ते गावा...

गुलाब आणि धोतरा

अतिलघूकथा गुलाब आणि धोतरा        एकदा काय झाले...गुलाबाची आणि धोत-याच्या फुलाची दोस्ती झाली.जिथे जिथे गुलाब असे तिथे तिथे धोत-याचे फूलही असे.कुठेतरी उकिरड्यावर फुलून दुर्गंध पसरवणा-या धोत-याच्या फुलाच्या वाट्याला नेहमी हेटाळणीच आलेली होती.पण गुलाबाच्या संगतीने त्याची दुर्गंधी तर कमी झालीच पण गुलाबाचा सुगंध ही त्याच्या काही पाकळ्यांना लागला.गुलाब बिचारा अबोल..धोतरा बोलघेवडा! आपल्या बोलघेवड्यापणाने त्याने लोकांना भूरळ पाडली.लोकही आता धोत-याची हेटाळणी करत नव्हते. ...आणि म्हणूनच त्याला असे वाटू लागले की लोक गुलाबापेक्षा आपल्यालाच जास्त मानतात.तो स्वतःला गुलाबापेक्षाही श्रेष्ठ समजू लागला.गुलाबाबरोबर फिरुन उगीच वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपलीच किर्ती वाढवण्यासाठी वेळ खर्ची घालावा असा त्याने निर्णय घेतला...आणि गुलाब व  धोत-याच्या फुलातील दोस्तीत अंतर पडू लागले.बिचारा गुलाब मूकपणे अश्रू ढाळत एकटाच आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिला. ....आज गुलाबाला फुलांच्या राजाचा मान आहे.धोत-याचे फूल दुर्गंधी पसरवत तिथेच उकिरड्यावर उभे आहे..! © अनिल एस.राऊत

दारुपुराण : भाग १/अशोक आणि समाधान

....गोष्ट रात्रीचीच...ज्यांचं आयुष्य सालं घालण्यातच गेलं त्या अशोकने कंपनी हवी म्हणून मला सोबत येण्याचा आग्रह केला.गेलो...त्यांनी त्यांचा ब्रँड घेतला व मी कोल्ड्रींक्स...      अशोक ख-या अर्थाने सालगडी..किती वर्षे झाली एकाच शेतक-याकडे सालावर आहे हे मलाही नक्की माहीत नाही...बाहेरगावहून येऊन इथे चाकरी करत करत अशोकने चिंचेचा व्यापार ही केला..बायको,मुलगी व मुलगा असा त्याचा परिवार.मुले हुशार तर होतीच पण बापाच्या गरीबीची आणि कष्टाची त्यांना जाण होती..मुलगी दहावी बारावी शिकली..तिचे लग्न थाटात लावून दिले.चाकरी करत करत मुलगा समाधान याला इंजिनियर केले.तो आज ४५ हजार पगार घेतोय.अगदी शांत,समजूतदार व निर्व्यसनी मुलगा.दिवस निवांत बसून खाण्याचे,पण अशोकने चाकरी सोडलेली नाही.खर्चापाण्यासाठी समाधाकडून एक रुपयाही घेत नाही.त्याचे समाधानला एकच सांगणे आहे," तू मला एक रुपयाही देऊ नको.सालं घालून मी जेवढं आणि जसं कमवलं तसंच तू तुझ्या तुझ्या भविष्यासाठी कमवून ठेव यातच मला समाधान आहे."     समाधान अशोकचे समाधान नक्कीच करणार यात शंका नाही.कारण त्याला आपल्या भूतकाळाची जाण आहे.   ...

आयुष्य

Image
*आयुष्य* गर्भातल्या गूढ अंधारातून सुरु होतो आयुष्याचा प्रवास-भविष्यकाळाच्या उदरातील अनाकलनीय दिशेने...!गूढ अंधारातून लख्ख प्रकाशात जेव्हा प्रवेश होतो आयुष्याचा-तेव्हा हसत असते प्रकाशाला निर्ढावलेले आयुष्य अन् रडत असते प्रकाशात प्रवेश करणारे आयुष्य! तिथूनच पंख फुटतात आयुष्याला...ज्याच्या त्याच्या प्राक्तनानुसार घडत जाते ज्याचे त्याचे आयुष्य...कुणाचे आयुष्य अल्पजीवी ठरते तर कुणाचे आयुष्य मध्यजीवी...कुणाचे आयुष्य सरकत जाते पूर्णत्वाकडे!       आयुष्याचा प्रवास असा क्षणा-क्षणांचे गतिरोधक पार करत सरकत असतो पुढे...कुणाचे आयुष्य ठेचकाळते अशा गतिरोधकांना...चाल धीमी होते आयुष्याची अन् कधी कधी हे आयुष्य सरकते बाजूला या प्रवासातून...इथपर्यंतच असतो त्याचा प्रवास...! बाकीची आयुष्ये मग शोधत रहातात आपल्याच प्रवासातील अडखळलेल्या गतिरोधकांची लांबी-रुंदी अन् खूश होतात पार केल्याच्या आविर्भावात!       आयुष्यालाही असतात अवस्था...बाल्यावस्था,तारुण्यावस्था आणि वार्धक्यावस्था!       भुईच्या उदरातून नुकत्याच अंकुरलेल्या अंकुरासारखे मुलायम आणि सोज्वळ असते बाल...

सलाईन

Image
         ÷:÷:÷:÷:÷:÷: सलाईन ÷:÷:÷:÷:÷:÷:       डॉ.कुबेर यांची ओ.पी.डी.आज पेशंटनी खचाखच भरली होती.आतल्या कॉटवर सिंगल डबल पेशंट सलाईनवर होते.बाहेर व्हरांड्यातल्या लोखंडी बाकड्यावर चार-पाच,तर प्लायवूडच्या बसणीवर सात-आठ पेशंट डॉक्टरांच्या दर्शनासाठी रांगेत बसले होते.पेशंट आला,धुतला आणि वाळत घातला असा पैसेकमावू उद्योग डॉ.कुबेरांनी कधी केला नव्हता.एका एका पेशंटला अर्धा-अर्धा तास तपासणीसाठी गेला तरी त्यांनी कधी घाई-गडबड केली नव्हती.बाहेरच्या रांगेतील पेशंट बोंबा मारायचे पण डॉक्टरांनी आपला वसा कधी टाकला नाही.       आजही एवढी गर्दी असूनही डॉक्टरांनी एक-एक पेशंट अगदी निवांतपणे तपासला.जसजशी वेळ वाढू लागली तसतशी रांगेतल्या पेशंटची हताशता आणि टेंपरेचर वाढू लागले.       लोखंडी बाकड्यावर बसलेला परशा बेचैन बेचैन वाटत होता.बाकड्यावरुन उठून बाहेर जावे तर नंबर हुकायची भीती म्हणून तो जागचा उठत नव्हता.हाता-पायांची थरथर जास्तच वाढली होती.मळमळही होत होती.मधूनच गोल गोल फिरल्यासारखे वाटत होते.आता इथून उठून जावे तर तीही मोठी पं...

सुगला

Image
:::::::::::: सुगला :::::::::               (ग्रामीण कथा) डोक्यावरच्या गवताच्या ओझ्याने तिची मान पाठ भरुन आली होती.कमरेतून निघालेली कळ थेट अवघडून गेलेल्या खांद्यापर्यंत पोहोचत होती.तरीही सुगला चालतच होती.ओझ्यामुळे तिची चाल जरा बेढबच भासत होती.पण त्या निर्जन वाटेवर ती चाल पाहणारे कुणी नव्हते म्हणून ती तशीच पाय ओढत अंतर कापायचा प्रयत्न करत होती....      सरावण सरत आला तरी पाऊस अजून हाद्या म्हणत नव्हता.आभाळ तर भरुन यायचे पण रीते व्हायचे नाही.जिकडे बघावे तिकडे मातीच्या लेकरांची नुसती होरपळ चाललेली दिसत होती.हाता-तोंडाशी आलेला घास घारीने झडप घालून हिसकावून न्यावा तसेच या दुष्काळाने केले होते.प्यायच्या पाण्याची अजून परापत झाली नसली तरी हे दिवस असेच पुढे राहिले तर मग मात्र जगणे मुश्कील झाले असते.हाताला तर काहीच कामधंदा मिळत नव्हता.पण सुगलाने अजून धीर सोडला नव्हता.गावात जरी कुठेच हिरवे दिसत नसले तरी गावापासून तीन कोसावरच्या वाण्याच्या वस्तीवर मात्र देवाची किरपा पहिल्यापासून होती.तो जिवंत पाण्याचा भाग असल्यामुळे तिथे पाण्याचा तुटवडा न...