सरपंचाचा जीआर
::::::::::::::: सरपंचाचा जीआर :::::::::::: चणेवाडीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लवकरच लागणार होती.सरपंच मदनराव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला होता.या पाच वर्षांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी गावात तब्बल पन्नास कोटींची विकासकामे केली होती.पण ती मदनरावाशिवाय कुणालाच दिसत नव्हती.आणि दिसणार तरी कशी?सगळ्या योजना कागदावरच होत्या.पन्नास कोटी मात्र सरपंचांच्या खिशात जमा झाले होते.आता निवडणुकीला उभे रहायचे तर विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिल्यासारखे होईल.गेल्या वेळीच विरोधकांनी आणि नुकत्याच उदयास आलेल्या सटरफटर पुढाऱ्यांनी मदनरावांवर नाही नाही ते आरोप केले होते.आता तर त्यात आपल्याच गटातले काही लोक सामिल होणार हे तर उघडच दिसत होते.कारण अडीच वर्षे मदनरावांनी सरपंचपद भोगायचे व उरलेली अडीच वर्षे श्रीपतरावांनी सरपंचपद उपभोगायचे असे आधीच ठरले होते.पण आपल्या कामाचे अधिकारी आणि कामाच्या योजना यांची ओळख व्हायलाच मदनरावांचा एक-दीड वर्षांचा काळ लोटला.परिणामी मदनरावांनी आधी ठरल्याप्रमाणे अडीच वर्षानंतर सरपंचपद सोडले नाही.त्यांच्याविरुध्द अविश्वास ठराव आणण्याचा श्रीपतरावांनी प्रयत्न केला पण ...